Ind Vs Eng 1st Test x
Sports

Ind Vs Eng : इंग्लंडच्या फलंदाजाचा चिडीचा डाव! मोहम्मद सिराज भडकला, मैदानात जोरदार राडा; Video

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराजसह अन्य भारतीय खेळाडू इंग्लंडच्या झॅक क्रावलीवर चिडले. लंचआधी सामन्यादरम्यान तणावपूर्ण स्थिती होती.

Yash Shirke

Ind Vs Eng Test मालिकेतील पहिला सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला ९० ओव्हर्समध्ये ३५० धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. पहिल्या सत्रामध्ये इंग्लंडचे गोलंदाज भारतीय संघावर वरचढ ठरले. सलामीवीर फलंदाजांनी ११७ धावांची भागीदारी केली. लंचपूर्वी मोहम्मद सिराज आणि झॅक क्रावली यांच्यामध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळले.

नेमकं काय घडलं?

लंचपूर्वी मोहम्मद सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला होता. लंचच्या आधी त्याने आणखी एक ओव्हर गोलंदाजी करावी, जेणेकरुन इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकता येईल अशी भारताची रणनीती होती. त्यानुसार सिराजने ओव्हर लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या डिलिव्हरीसाठी त्याने रनअप सुरु केला. तेव्हा स्ट्राईकवर असलेल्या झॅक क्रावली मुद्दामून क्रीजपासून दूर गेला. वेळ वाया घालवण्यासाठी त्याने ही कृती केली. यामुळे सिराजला दुसरी ओव्हर टाकण्याची संधी मिळाली नाही.

झॅक क्रावलीच्या कृत्याने मोहम्मद सिराज भडकला. कर्णधार शुभमन गिलसह संघातील अन्य भारतीय खेळाडूंनीही नाराजी व्यक्त केली. काही क्षणांसाठी मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या घटनेवरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकजण इंग्लंडच्या फलंदाजावर बेईमानी केल्याचा आरोप करत आहेत.

इंग्लंडची दमदार सुरुवात

पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला झॅक क्रावली आणि बेन डकेट हे इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज मैदानात उतरले. त्यांनी प्रसंगी संयमी, तर गरज असताना आक्रमक खेळी केली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांपैकी एकाही भारतीय वेगवान गोलंदाजाला विकेट मिळवण्यात यश आले नाही. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने ११७ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT