team india twitter
Sports

IND vs ENG, Toss Update: टीम इंडियाचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय; सूर्याने मुख्य गोलंदाजाला बसवलं, पाहा Playing XI

Team India Playing XI, Ind vs Eng 1st T20I: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवसाआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली होती. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसून येणार नाहीये. त्याच्या जागी फिल सॉल्ट यष्टीरक्षण करताना दिसून येणार आहे.

तर भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बद्दल बोलायचं झालं, तर मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगला संधी दिली गेली आहे. तर हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी देखील वेगवान गोलंदाजांच्या भूमिकेत असतील. यासह फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी देण्यात आळी आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंडचा संघ: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन, जेकब बेथेल, जेमी ओव्हर्टन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारतीय संघाची प्लेइंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT