abhishek sharma twitter
Sports

IND vs ENG: गुरु तसा शिष्य! अभिषेकने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगची केली बरोबरी

Abhishek Sharma Equals Record Of Yuvraj Singh: भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Ankush Dhavre

भारताचा युवा तारा अभिषेक शर्मा पहिल्याच टी -२० सामन्यात चांगलाच चमकला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी -२० सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वादळी सुरुवात करून दिली. दरम्यान अर्धशतक झळकावताच त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगची बरोबरी केली आहे.

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने ३४ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची खेळी केली. त्याने आपले अर्धशतक अवघ्या २० चेंडूत पूर्ण केले. यासह तो भारतात खेळताना संयुक्तरित्या वेगवान अर्धशतक झळकावणारा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.

हा रेकॉर्ड करणारा तिसराच भारतीय फलंदाज

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघ १३३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात आली. दोघांनीही संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर अभिषेक शर्माने भार खांद्यावर घेत इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या वादळी खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार खेचले. यादरम्यान त्याने २३२.३५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

या अर्धशतकासह तो भारतात खेळताना संयुक्तरित्या वेगवान अर्धशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. या रेकॉर्डमध्ये त्याने आपला गुरु युवराज सिंगची बरोबरी केली आहे.

भारतासाठी मायदेशात खेळताना टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज

सूर्यकुमार यादव -१८ चेंडू ( विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२२)

गौतम गंभीर - १९ चेंडू ( विरुद्ध श्रीलंका, २००९)

अभिषेक शर्मा - २० चेंडू ( विरुद्ध इंग्लंड, २०२५)

युवराज सिंग - २० चेंडू ( विरुद्ध श्रीलंका, २००९)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT