kl rahul catch video  twitter
Sports

KL Rahul Catch Video: केएल राहुलचा 'सुपरमॅन कॅच', संधी मिळाली नाही तर खेचून आणली! Video एकदा पाहाच

India vs Bangladesh, KL Rahul Catch: केएल राहुलने या डावात भन्नाट झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

KL Rahul Catch Video:

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील १७ वा सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या डावात केएल राहुलने यष्टीच्या मागे एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (KL Rahul Catch Video)

या डावात भारतीय संघाकडून २५ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू मोहम्मद सिराजने लेग साईडच्या दिशेने टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या मेहदी हसनने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला, कारण चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षण करत असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

हा झेल दिसतोय तितका सोपा नव्हता. कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्यानंतर चेंडू त्याच्यापासून लांब जात होता. मात्र केएल राहुलने डाव्या बाजूला डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. केएल राहुलच्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

बांगलादेशी सलामीवीरांची दमदार सुरूवात..

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. तन्जिद हसनने ४३ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.

तर लिटन दासने ८२ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार मारले. या दोघांमध्ये ९३ धावांची भागीदारी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे ₹१५०० जमा, आता जानेवारीचा हप्ता कधी येणार?

Maharashtra Live News Update: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

Valentine Day Love Story: प्रेमपत्र! नसीब में नहीं था जो हमको मिला नहीं

Quick easy tilgul recipe: मकर संक्रांतीसाठी घरीच बनवा झटपट तीळगूळ, वाचा सोपी पद्धत

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकायचे, लेकीने एकदा नव्हे तर दोनदा केली क्रॅक; IAS अनुराधा पाल यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT