IND vs BAN: टीम इंडियाला तगडा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त; वेदनेने कळवळत सोडलं मैदान

Hardik Pandya Injury: सामन्याच्या सुरूवातीलाच संघाला मोठा धक्का बसला आहे.
hardik pandya
hardik pandyatwitter
Published On

Hardik Pandya Injury :

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्याच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं आहे.

पहिल्याच षटकातील ३ चेंडू टाकल्यानंतर त्याला पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे षटक पूर्ण करण्यासाठी पुढील ३ चेंडू टाकावे लागले आहेत.

या सामन्यात बागंलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना भारतीय संघाकडून ९ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता. षटाकातील पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला. त्यानंतर पुढील २ चेंडूवर बांगलादेशी फलंदाजांनी आक्रमण करत सलग २ चौकार मारले.

या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर त्याचा पाय मुरगळला आणि तो जागेवरच पडला. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर फिजियोला मैदानावर यावं लागलं. फिजियो पट्टी त्याच्या पायाला पट्टी बांधली. (Latest sports updates)

hardik pandya
Paras Mhambrey Statement: '...म्हणून शमी आणि अश्विनला आम्ही संधी देत नाही.', IND vs BAN लढतीपूर्वी बॉलिंग कोचचा मोठा खुलासा

त्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. ही दुखापत गंभीर असून त्याचं या सामन्यात गोलंदाजी करणं कठीण दिसून येत आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

hardik pandya
IND vs BAN: बांगलादेशला हलक्यात घेणं पडू शकतं महगात; वाचा कसा राहिलाय IND vs BAN चा वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड

हार्दिक पंड्या फलंदाजीसह गोलंदाजीतही मोलाचं योगदान देतोय. मात्र या सामन्यात तो गोलंदाजी करताना दिसून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शार्दुल ठाकुरवर मोठी जबाबदारी असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील नेट्समध्ये ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसून आला होता. त्यामुळे तो देखील या सामन्यात गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com