Paras Mhambrey Statement: '...म्हणून शमी आणि अश्विनला आम्ही संधी देत नाही.', IND vs BAN लढतीपूर्वी बॉलिंग कोचचा मोठा खुलासा

India vs Bangladesh, Paras Mhambrey Statement: या सामन्यापूर्वी
Paras Mhambrey Stetement
Paras Mhambrey StetementSaam tv news
Published On

India vs Bangladesh, Paras Mhambrey Statement:

भारताचा संघ सध्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय. यजमान भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला धूळ चारली आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या आव्हानसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

दरम्यान क्रिकेट चाहत्यांना आणि अनेक दिग्गजांना एक प्रश्न सतावतोय. तो म्हणजे मोहम्मद शमी आणि आर अश्विनला संधी केव्हा मिळणार? याबाबत गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी मोठा खुलासा केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार मोहम्मद शमी आणि आर अश्विनबाबत बोलताना पारस म्हांब्रे म्हणाले की, ' आम्ही त्याला ( मोहम्मद शमी) स्पष्टपणे सांगितलं आहे. आम्ही जेव्हा प्लेइंग ११ ची निवड करतो त्यावेळी त्या खेळपट्टीसाठी जो योग्य गोलंदाज असेल त्यालाच संधी दिली जाईल.'

आशिया चषक २०२३ स्पर्धेदरम्यान भारतीय गोलंदाजी आक्रमणात रोटेशन पॉलिसी पाहायला मिळाली होती. आता वर्ल्डकप स्पर्धेत तसं काही पाहायला मिळालेलं नाही. याबाबत बोलताना पारस म्हांब्रे म्हणाले की, ' आतापर्यंत आम्ही याबाबत कुठलीही चर्चा केलेली नाही. आम्हाला एक फ्लो मिळाला आहे. आता आम्हाला याच फ्लोमध्ये पुढे जायचं आहे.' (Latest sports updates)

Paras Mhambrey Stetement
IND vs BAN, Weather Report: भारत - बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेले काही महिने संघाबाहेर होता. त्यानंतर नेदरलँडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत त्याने दमदार कमबॅक केलं होतं. भारतीय संघाला आशिया चषक २०२३ स्पर्धा जिंकून देण्यात देखील त्याने मोलाची भूमिका बजावली होती. हीच कामगिरी त्याने वर्ल्डकप स्पर्धेतही सुरू ठेवली आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

Paras Mhambrey Stetement
World Cup 2023: इंस्टाग्राम रिल्स स्टार्सला मिळणार पुण्यातील मॅचचं फ्री तिकीट! ही आहे अट; रोहित पवारांचा Video व्हायरल

पारस म्हांब्रे यांनी जसप्रीत बुमराहचं कौतुक करत म्हटले की, ' संघाला गरज असताना तो पावरप्लेमध्ये विकेट मिळवून देतो. तो मधल्या षटकांमध्येही दमदार गोलंदाजी करतो आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यात तो टॉपचा गोलंदाज आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com