भारतीय संघ आज बांगलादेशविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान या सामन्यापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा
पुण्यात होणारा हा सामना ऐतिहासिक असणार आहे. कारण तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे. या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी पुणेकर एकच गर्दी करताना दिसून आले आहेत.
एकिकडे क्रिकेट फॅन्सची तिकीट मिळवण्याची धडपड सुरू असताना, आमदार रोहित पवार यांनी, इंस्टाग्राम सेलिब्रिटींना मोफत तिकीट दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र हे तिकीट मिळवण्यासाठी रोहित पवार यांनी एक अट ठेवली आहे.
या सामन्याच्या एक दिवसापूर्वी रोहित पवारांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते अथर्व सुदामेसोबत गप्पा मारताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'जर तुमच्या इंस्टाग्राम रिलला २० लाखांहुन अधिक व्ह्यूज असतील तर तिकीट द्यायची जबाबदारी आमची.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)
तब्बल २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच या मैदानावर वर्ल्डकप स्पर्धेचा सामना रंगणार आहे. त्यानंतर पुढील सामना अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३० ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार हे सामने ..
भारत विरुद्ध बांग्लादेश- १९ ऑक्टोबर, २०२३
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - ३० ऑक्टोबर, २०२३
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- १ नोव्हेंबर, २०२३
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड- ८ नोव्हेंबर, २०२३
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- १२ नोव्हेंबर,२०२३
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.