IND Vs BAN Asia Cup Final Saam Digital
Sports

IND Vs BAN Asia Cup Final : लढवय्या! भारतीय महिला संघ Asia Cup फायनलमध्ये; 'स्मृती'च्या तडाख्यात बांगलादेशचा सुपडासाफ

Women Asia Cup IND Vs BAN : आशिया कपच्या पहिल्या उपांत्य फेरीत महिला भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा १० विकेट राखून पराभव केला. याविजयासह भारतीय संघानेआशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.

Sandeep Gawade

आशिया कपच्या पहिल्या उपांत्य फेरीत महिला भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. याविजयासह भारतीय संघाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दिमाखात एन्ट्री केली आहे. दाम्बुलाच्या मैदानावर भारतीय संघाने बांगलादेशला ८१ धावांत गुंडाळलं होतं. हे सोपं आव्हान भारताने एकही विकेट न गमावता केवळ ११ षटकांत अगदी सहज गाठलं. यात स्मृती मानधनाच्या तडाखेबंद अर्धशतकाचं मोठं योगदान आहे.

सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद ५५ धावांच योगदान दिलं. तर शेफाली वर्माने २८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावांची नाबाद खेळी केली. रेणुका सिंगने ४ षटकांत केवळ १० धावा देत बांगलादेशच्या ३ विकेट घेतल्या. तर राधाने १४ धावा देत ३ गडी तंबूत पाठवले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतीय महिला संघाने सलग नवव्यांदा आशिया चषक अंतिमफेरीत प्रवेश केला आहे.

प्रथम फंलदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेला केवळ ८० धावा करता आल्या. कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक ५१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. शोर्ना अख्तरने १८ चेंडूत २ चौकारांसह नाबाद १९ केल्या. या दोन खेळांडूंव्यतीरिक्त कोणत्याही खेळाडूला मैदानावर भारतीय गोलंदाजांनी टिकू दिलं नाही .

रेणुका सिंगने पहिल्याच षटकात दिलारा अख्तरला बाद करत बांगलादेशला पहिला झटका दिला. यानंतर रेणुकाने तिसऱ्या आणि पाचव्या षटकात २ गडी बाद केले. राधा यादवने २० व्या षटकात एकही धाव न देता बांगलादेशचे २ गडी टिपले. कर्णधार निगार आणि शोरना यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. राधाने २० व्या षटकात निगारला बाद करत ही जोडी फोडली. याव्यतीरिक्त कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे ८० धावांच आव्हान भारतीय संघाने अगदी सहज सर केलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT