ind vs ban Asia cup 2023 possible four changes in team india against bangladesh Saam TV
Sports

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात होणार मोठे बदल; या खेळाडूंना मिळणार संधी

IND vs BAN Playing-11: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

India vs Bangladesh Playing-11: पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही पराभवाची धूळ चारत टीम इंडियाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आज भारतीय संघाचा सामना बांग्लादेशसोबत होणार आहे. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी ३ वाजता सामन्याला सुरूवात होईल. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

भारतीय संघात होणार मोठे बदल?

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यात आशिया कपमध्ये आतापर्यंत चारही सामने खेळलेले दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली सुद्धा या सामन्यात विश्रांती घेऊ शकतात. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं.

त्याचबरोबर फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना संधी मिळू शकते. दरम्यान, दोन्ही संघाची आकडेवारी बघितली, तर भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ३९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने ३१ तर बांगलादेश संघाने फक्त ७ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईग ११

हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT