
आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत श्रीलंकेने दोन गडी राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने फायनलमध्ये धडक दिली आहे. आता १७ सप्टेंबरला श्रीलंकेचा सामना भारताशी होईल. हा सामना कोलंबोच्या प्रेमदासा मैदानातच खेळवला जाणार आहे.
पावसामुळं दोन तास उशिराने सुरू झालेला सामना प्रत्येकी 42 षटकांचा खेळवला गेला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्ताननं 7 बाद 252 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाने सुरुवात चांगली केली. सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच, अखेरच्या षटकांमध्ये ट्विस्ट आला. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 8 धावांची गरज होती. तर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती. मात्र, चरिथ असलंकाने (नाबाद 49 धावा) दोन धावा घेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
या सामन्यात ३५ व्या षटकांपर्यंत श्रीलंकेचं पारडं जड राहिलं. मात्र, ३६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इफ्तिखारने कुसल मेंडिसला तंबूत धाडलं. मोहम्मद हारिसने त्याचा सुंदर झेल पकडला. मेंडिसने ९१ धावांची झंझावाती खेळी केली. (Latest sports updates)
मेंडिस बाद होताच पाकिस्तानचा उत्साह वाढला. पाकिस्तानी गोलंदाजांच्या दबावाखाली श्रीलंकेचा डाव पुन्हा डळमळीत झाला. पुढच्या पाच षटकांत श्रीलंकेचे तीन गडी बाद झाले. तर ४१ व्या षटकात शाहीन आफ्रिदीने सलग दोन चेंडूंवर दोन फलंदाजांना बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली. (Latest Marathi News)
श्रीलंकेला अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती. जमान खानने सुरुवातीच्या ४ चेंडूंवर फक्त दोन धावा दिल्या. यात एक फलंदाज धावबाद झाला. मात्र, पाचव्या चेंडूवर असलंकाने चौकार लगावला. तर अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढून असलंकाने विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून इफ्तिखारने सर्वाधिक ३ फलंदाज बाद केले. तर आफ्रिदीने दोन गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.