india vs bangladesh 1st T20 saam tv
Sports

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

arshdeep singh record1st T20: नुकत्याच झालेल्या T20 सामन्यात अर्शदीप सिंग भारताला विजय मिळवायला हातभार लावला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने बांगलादेशावर मात केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बांग्लादेश विरुद्ध भारत T20 सामना रविवारी झाला. सूर्यकुमारच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने हा सामना खेळला. टॉस गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. भारताचा हा सामना चांगलाच रंगला होता. प्रतिस्पर्धी धावांचा स्कोर १४ असताना अर्शदीप सिंगने बांगलादेशी खेळाडूंना दोन धक्के दिले. अशी रंजक सुरुवात भारताच्या अर्शदीप सिंगने केली.

भारताकडून अर्शदीप सिंग हा वन साईट गोलंदाजी करत होता. पहिल्या ओवरच्या पाचव्याच बॉलला त्याने विकेट घेतली. दरम्यान या सामन्यात अर्शदीपने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सगळ्या खेळाडूंना मागे टाकत या मॅचचा तो हिरो ठरला. या सामन्यात अर्शदीप सिंगने ३.५ ओवरमध्ये १४ रन देत ३ प्रतिस्पर्धींचे बळी विकेट्स घेतले. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने बांगलादेशावर मात केली.

अर्शदीपने केली मोठा कामगिरी

अर्शदीप सिंगने आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि क्रिकेट खेळाडूंना मागे टाकलंय. आता अर्शदीप सिंग रविचंद्रन अश्विनसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेशच्या सामन्यात लिटन दास या खेळाडूला आऊट करुन अर्शदीप सिंगने ही कामगिरी केली आहे. T20 सामन्याच्या अर्शदीप सिंगने ४ विकेट त्याच्या नावावर केल्या. तर अश्विनने सुद्धा ही कामगिरी केली होती. तसंच अर्शदीप सिंग, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, दिपक चाहर आणि हार्दीक पांड्या यांचा रेकॉर्ड ब्रेक केला.

T20 च्या सामन्यात पहिल्या ओवरचे विकेट घेणाऱ्या खेळाडुंची यादी-

१८- भुवनेश्वर कुमार

४- अर्शदीप सिंग

४-रवी अश्विन

३ - आशिष नेहरा

३ - जसप्रीत बुमराह

३ - दीपक चहर

३ - हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा विजय

इंडियाने पहिल्या T20 च्या सामन्यात अवघ्या ११.५ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावले. त्यानंतर १३२ रन्स केले आणि ७ विकेट्सने सामना जिंकला. टीम इंडियाच्या विजयात सगळ्या खेळांचा मोलाचा वाटा आहे. यादरम्यान प्रसिद्ध क्रिकेटर हार्दीक ने सामन्यात २४३.७५ च्या स्टाईक रेटने फलंदाजी केली. असा प्रकारे भारताला खेळाडुंनी विजय मिळवून दिला.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT