nitish kumar reddy twitter
क्रीडा

Nitish Kumar Reddy: 6,6,6,6,6,6,6..,'रेड्डी इज रेडी'! दिल्लीत नितीशचं वादळ

Ankush Dhavre

Nitish Kumar Reddy, India vs Bangladesh 2nd T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

सुरुवातीला बांगलादेशच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान आपला दुसराच सामना खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने आपल्या दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे.

नितीश कुमार रेड्डीला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना नाबाद १६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याला फार फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने याचा चांगलाच फायदा घेतला.

सुरुवातीला चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नव्हता. मात्र त्यानंतर त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. अर्धशतक झळकावण्याआधी त्याला एकदा जीवदान मिळालं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

षटकारांचा पाऊस पाडत त्याने २७ चेंडूत आपलं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याला ७४ धावांवर बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. यादरम्यान त्याने ७ गगनचुंबी षटकाकर आणि ४ चौकार मारले.

असा राहिलाय रेकॉर्ड

नितीश कुमार रेड्डी हा आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे चर्चेत आला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला १५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ३०३ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

Ratan Tata death : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशावर शोककळा

IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

Ajit Pawar : 'दादा बारामतीतून तुम्हीच लढा'; अजित पवारांना कार्यकर्त्यांचा आग्रह, नेमकं काय राजकारण शिजतंय? वाचा

Pankaja Munde : दसरा मेळाव्यात राजकीय संघर्षाबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?

SCROLL FOR NEXT