IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, प्रत्येक संघ ५ खेळाडूंना रिटेन करू शकतो. तर एका खेळाडूला RTM कार्डचा वापर करून आपल्या संघात पुन्हा घेऊ शकतो. आतापर्यंत कुठल्याही संघाने आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. दरम्यान एक खेळाडू असा आहे, जो लिलावात येताच फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडतील.
आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार यात काही शंकाच नाही. मात्र भारताचा एक असा खेळाडू आहे, ज्याच्यावर मोठी बोली लागू शकते. हा खेळाडू आहे,अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया. गेल्या काही वर्षांपासून त्याने आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यासह गेल्या काही वर्षांत त्याने फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तेवतियाची ही कामगिरी पाहता, आगामी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. तेवतियाने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ४ संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यात राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या ४ संघाचा समावेश आहे.
तेवतियाने आतापर्यंत ९३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १०१३ धावा केल्या आहेत. तेवतिया आपल्या फिनिशिंगसाठी प्रसिद्ध आहे. आता कोणता संघ त्याच्यावर मोठी बोली लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.