IND vs BAN Saam TV
क्रीडा

IND vs BAN : जखमी रोहित शर्मा शेवटपर्यंत नडला, पण पराभव टाळता आला नाही; अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा विजय

आजच्या सामन्यातही टीम इंडियाची फलंदाजीची टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरली.

साम टिव्ही ब्युरो

IND vs BAN 2nd ODI : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा (Team India)  सलग दुसऱ्या सामन्यातही पराभव झाला आहे. बांगलादेशने 5 धावांनी भारताचा पराभव केला. आजच्या सामन्यातही टीम इंडियाची फलंदाजीची टॉप ऑर्डर सपशेल फेल ठरली.

रोहितने शेवटी विजयाच्या आशा जाग्या केल्या, मात्र अत्यंत कमी फरकाने बांगलादेशने बाजी मारली. बांगलादेशने आजच्या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. मेहदी हसन मिराज पुन्हा एकदा आजच्या सामन्याचा हिरो ठरला.   (Sports News)

ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत सात गडी गमावून 271 धावा केल्या. मेहदी हसन मिराजने 83 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी खेळली.

याशिवाय महमुदुल्लाहने 77 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 50 षटकांत नऊ गडी गमावून 266 धावा करू शकला. या सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतरही रोहित महत्त्वाच्या क्षणी मैदानात उतरला.

रोहित शर्मा दुखापतीमुळे सलामीला येऊ शकला नाही. त्यामुळे विराट कोहलीने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात केली. भारताची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 13 धावांत दोघेही तंबूत परतले. 65 धावांत चार विकेट पडल्या होत्या, पण डाव सांभाळण्याचे काम श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 107 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. 82 धावांची शानदार खेळी खेळून अय्यर बाद झाला, तर अक्षरने 56 धावांचे योगदान दिले.

43व्या षटकापर्यंत भारताने 207 धावांवर सात विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर रोहितने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने 28 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रोहितच्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. शेवटच्या दोन षटकात भारताला विजयासाठी 41 धावांची गरज होती आणि रोहितने संघाला अगदी जवळ आणले होते पण संघाला विजय मिळवता आला नाही. सामना गमावला असला तरी रोहितने चाहत्यांनी मनं जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT