Cricket News : पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा; WTC फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळा

इंग्लंडने कसोटी सामन्यांत पाकिस्तानचा ११५ धावांनी पराभव केला. या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला असून भारताला फायदा झाला आहे.
Team India, WTC Points Table
Team India, WTC Points Table Saam TV

WTC Points Table : लाहोरमध्ये नुकताच इंग्लंड आणि पाकिस्तान संघात टेस्ट सामना पार पडला. या सामन्यांत इंग्लंडने पाकिस्तानचा ११५ धावांनी पराभव केला. या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फटका बसला असून भारताला फायदा झाला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आता भारतीय संघ चौथ्या स्थानावर आला आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे पाकचा संघ चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर फेकला गेलाय. (Sports News)

Team India, WTC Points Table
IND vs BAN, 1st ODI : केएल राहुलची एक चूक अन् तिथेच टीम इंडियानं मॅच गमावली, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

पाकिस्तानच्या पराभवाचा भारतीय संघाला (Team India) चांगलाच फायदा झाला आहे. आता भारत आणि पाकिस्तान या पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. दोघांमध्ये केवळ 6 अंकांचा फरक आहे. अशामध्ये जर पाकिस्तान हा सामना जिंकला असता तर त्यांना 12 पॉईंट्स मिळाले असते आणि ड्रॉ झाल्यानंतर पाकिस्तानच्या खात्यामध्ये केवळ 6 पॉईंट्स असते, आणि ते भारतीय संघाच्या पुढे गेले असते.

याआधी ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरोधातील कसोटी मालिका जिंकून WTC मध्ये आपले स्थान पहिले स्थान आणखीच मजबूत केले आहे. ऑस्ट्रेलिया 75 टक्के विजयासह टॉपवर आहे. त्यांनी 5 मॅच जिंकल्या असून 3 ड्रॉ केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची टक्केवारी 60 आहे.

Team India, WTC Points Table
Weather Updates : स्वेटर नाही, रेनकोट घाला! ऐन थंडीत कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट

दुसरीकडे भारतीय संघ 52.08 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका (53.3) तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 3 सामने खेळले असून यातील 2 सामन्यांत त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी 50 टक्के इतकी आहे.

रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा पराभव झाल्याने भारताची अंतिम फेरीत जाण्याची शक्यता वाढली आहे. टीम इंडियाचे अद्याप एकूण 6 सामने बाकी आहेत. यातील 2 सामने हे बांगलादेशविरुद्ध तर 4 सामने हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. जर टीम इंडियाने बांगलादेशला कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 किंवा 3-1 अशी जिंकली, तर भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहचू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com