Ind vs Ban 1st Test 1 day/ BCCI-twitter SAAM TV
Sports

Ind vs Ban Highlights : पुजाराचं शतक थोडक्यात हुकलं, श्रेयस अय्यरच्या साथीनं टीम इंडिया भक्कम स्थितीत

Ind vs Ban 1st Test Day 1 Highlights : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा ढेपाळलेला डाव चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या तगड्या भागीदारीमुळं सावरला.

Nandkumar Joshi

Ind vs Ban 1st Test Day 1 Highlights : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा ढेपाळलेला डाव चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरच्या तगड्या भागीदारीमुळं सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ६ बाद २७८ धावा झाल्या.

चटगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल यानं नाणेफेक जिंकली. त्यानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, अपेक्षित सुरुवात झाली नाही. मात्र, अय्यर आणि पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. बांगलादेशनं ८५ आणि नंतर ९० व्या षटकात दोन विकेट घेतल्यानं भारताला पुन्हा बॅकफूटवर नेले. (Latest Marathi News)

कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर हा ८२ धावांवर खेळत होता. तो जास्त वेळ मैदानात राहिला तर, भारताला चांगली धावसंख्या उभारता येऊ शकते. दिवसाच्या अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मेहेदी हसन मिराजनं अक्षर पटेल (१४ धावा) ला बाद केले. तर पुजारा ८९ धावा करून बाद झाला. त्यानं २०३ चेंडूंचा सामना केला. त्यात त्यानं ११ चौकार मारले. (Sports News)

संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवण्यात रिषभ पंतची लहानशी पण आक्रमक खेळीचं योगदान होतं. त्यानं इतर फलंदाजांवरील दबाव कमी करण्यास मदत केली. पंत यानं ४५ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं ४६ धावा केल्या.

कर्णधार केएल राहुल स्वस्तात माघारी

कर्णधार केएल राहुल यानं सलामीवीर शुभमन गिल याच्या साथीनं डावाची सुरुवात चांगली करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाच्या ४१ धावा असताना ताइजुल इस्लाम यानं गिलला बाद केले. त्याने २० धावा केल्या. त्यानंतर ४५ धावा असताना कर्णधार केएल राहुलला खालीद अहमद यानं बाद केलं. राहुलनं २२ धावा केल्या. तीन धावा जोडल्यानंतर विराट कोहलीही बाद झाला. कोहलीला केवळ एक धाव करता आली.

पंतने पुजाराच्या साथीनं डाव सावरला. पुजारा एका बाजूला टिच्चून फलंदाजी करत होता. तर पंत वेगाने धावा करत होता. मात्र, पंतला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. मेहेदी हसन मिराजच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात त्यानं विकेट गमावली.

पुजारा-अय्यरनं डावाला आकार दिला

त्यानंतर मैदानात आलेल्या अय्यरनं पुजाराला चांगली साथ दिली. दोघांनी बांगलादेशी गोलंदाजांच्या खोचक माऱ्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं. दोघांनी सुरेख फटकेबाजी केली. या दोघांनी ११२ धावांवरून धावसंख्या २६१ पर्यंत पोहोचवली. पुजारा २०१९ पासूनचा कसोटी शतकांचा दुष्काळ संपवेल असं वाटत होतं, पण तो बाद झाला. त्यामुळं कसोटी शतकाची प्रतीक्षा लांबली. बांगलादेशच्या ताइजुलने तीन विकेट घेतल्या. मिराजने दोन विकेट घेतल्या, तर अहमदने एक विकेट घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT