shubman gill twitter
क्रीडा

Shubman Gill Record: शून्यावर बाद होताच गिलच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद! यादीत कोहलीचाही समावेश

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.

मात्र प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा शुभमन गिल शून्यावर माघारी परतला आहे. दरम्यान त्याच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात शुभमन गिल ८ चेंडू खेळला, मात्र त्याला खातंही उघडता आलं नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सापळा रचून गिलची शिकार केली. बांगलादेशी गोलंदाजांनी गिलला लेग साईडला खेळण्यासाठी भाग पाडलं.

अखेर हसन महमूदने लेग साईडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर गिलने फाईन लेगच्या दिशेने शॉट मारला. मात्र त्याचा अंदाज चुकल्याने त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

गिलच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

शुभमन गिल या वर्षात मायदेशात खेळताना तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यासह एकाच वर्षात ३ किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला आहे. या यादीत भारताचे माजी फलंदाज मोहिंदर अमरनाथ अव्वल स्थानी आहेत. ते १९८३ मध्ये पाच वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतले होते . तसेच या यादीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा देखील समावेश आहे. विराट २०२१ मध्ये आतापर्यंत ३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आले होते. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर शुभमन गिल शून्यावर आणि विराट कोहली देखील ६ धावा करत माघारी परतला. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना हसन महमूदने सुरुवातीला भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT