world cup 2023 twitter
क्रीडा

World Cup 2023: 'अरे जरा तरी लाज वाटू द्या.'वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मार्शला नेटकऱ्यांनी झापलं

Ankush Dhavre

India vs Australia, Mitchell Marsh News:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हा सामना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. दरम्यान या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान करताना दिसून आला आहे.

मिचेल मार्शने २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाचे प्रतिनिधित्वे केले होते. यावेळी ही तो वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. या सामन्यानंतर तो आपल्या गोलंदाजी किंवा फलंदाजीमुळे नव्हे तर ड्रेसिंग रुममध्ये केलेल्या कृत्यामुळे चर्चेत आला आहे. (Mitchell Marsh Placing His Feet On World Cup Trophy)

सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात मिचेल मार्श वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेऊन बसल्याचं दिसून येत आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की , ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या ट्रॉफीचे हकदार नाही. तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, ती वर्ल्डकपची ट्रॉफी आहे, त्या ट्रॉफीचा सन्मान करायला हवा.' (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा जोरदार विजय..

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली.

तर विराट कोहलीने ५४ आणि रोहित शर्माने ४७ धावांची खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविड हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

Navratri 2024: देवीला दाखवा हा नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण

Haryana Election Exit Poll : हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार? भाजपची हॅट्ट्रिक हुकणार, जाणून घ्या Exit Poll चे अंदाज

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

SCROLL FOR NEXT