IND Vs AUS, Women’s T20 WC 2023 ICC TWITTER
Sports

INDW Vs AUSW: भारताच्या रणरागिणी शेवटपर्यंत लढल्या! पण 'फायनल'चं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी पराभव

IND Vs AUS, Women’s T20 WC 2023: अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे.

Chandrakant Jagtap

IND Vs AUS, Women’s T20 WC 2023: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत भारताला पराभव स्विकारावा लागला. अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतावर 5 धावांनी विजय मिळवला. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा यांनी भारताला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु दोघीही बाद झाल्यानंतर भारताच्या एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि भारतीय संघ २० षटकांत केवळ २५७ धावाच करू शकला. यामुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे.

ऑस्ट्रेलियाने गाठली अंतिम फेरी

अॅश गार्डनर-डार्सी ब्राऊन यांच्या नेतृत्वाखालील शानदार गोलंदाजीसह भक्कम क्षेत्ररक्षणाच्या बळावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनर आणि ब्राऊनने २-२ बळी घेतले, तर मेगन शट आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविले. (Latest Sports News)

ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७२/४ धावा केल्या. सलामीवीर बेथ मुनीचे अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंगच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. (cricket news)

ऑस्ट्रेलियाकडून मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. कर्णधार लॅनिंगने ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. त्यांच्याशिवाय ऍश गार्डनरने ३१ आणि यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिलीने २५ धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

काय म्हणाली हरमनप्रीत कौर

सामन्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. मी आणि जेमी फलंदाजी करत असताना ती गती परत मिळवण्यासाठी खेळत होतो, आम्हाला याची अपेक्षा नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले यापेक्षा दुर्दैवी दुसरे काहीही असू शकत नाही. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचे ठरवले होते. परिणामी निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण आम्ही या स्पर्धेत ज्या प्रकारे खेळलो त्यामुळे मी खूश आहे. आम्हाला माहित आहे की आम्ही हरलो तरी आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतोष बांगरचे महिलांसोबत अनैतिक संबंध, भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

Lado Laksmi Yojana: महिलांसाठी खास योजना! दर महिन्याला मिळतात ₹२१००; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

IND vs SA: रांची वनडेपूर्वी धोनीच्या घरी पोहोचला विराट; स्वतः माहीने चालवली कार

Kitchen Hacks : मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT