Pakistan Cricketers English: पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्रजी हा जगभरातील चेष्टेचा विषय आहे. पाकिस्तानी खेळाडूची इंग्रजी हा संशोधनाचा विषय आहे. सोशल मीडियावर अनेकजण यावर भाष्य करत असतात. मात्र आता खुद्द पाकिस्तानातील माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तानच्या माजी खेळाडू कामरान अकमलच्या इंग्रजीची खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमसह संघातील अनेक खेळाडू खराब इंग्रजीमुळे ट्रोल होत असतात. या यादीत कामरान अकमलचाही समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने लाईव्ह शोदरम्यान कामरान अकमलची पार वाट लावली आहे. (Cricket News)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर लाइव्ह शोदरम्यान कामरान अकमलला सांगत आहे की, 'सकरीन' नहीं होता है भाई... स्क्रीन होता है. कामरान अकमल स्क्रीनऐवजी सकरीन बोलत आहे. शोएब अख्तरने लाईव्ह शोमध्ये कामरान अकमलचे कान उपटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरीही यावरून मजा घेताना दिसत आहेत.
शोएब अख्तरने यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. बाबर आझम हा पाकिस्तानचा सर्वात मोठा ब्रँड असायला हवा होता, पण कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजीमुळे तो मोठा ब्रँड नाही, असं त्याने म्हटलं होतं.
विराट कोहली हा एक मोठा ब्रँड आहे, कारण त्याची कम्युनिकेशन स्कील आणि इंग्रजी उत्कृष्य आहे. रावळपिंडी एक्सप्रेसने म्हटले की, क्रिकेट खेळणे आणि मीडिया हाताळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाबर आझम यांनी यावर काम करावे, असा सल्लाही त्याने दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.