virat kohli twitter
Sports

IND vs AUS: बॅटिंगला येण्याआधीच विराटने इतिहास रचला! या मोठ्या रेकॉर्डमध्ये बनला नंबर १

Virat Kohli Most Catches: भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहलीने फलंदाजीला येण्यापूर्वीच मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली चेजमास्टर म्हणून ओळखला जातो. जेव्हा महत्वाच्या सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना मैदानावर टीकून राहायचं असतं, तेव्हा विराट खंबीरपणे उभा राहतो.

विराटने फलंदाजीत अनेक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वीच विराट कोहलीच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली.

विराट बनला नंबर १

विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात फिट क्रिकेटपंटूपैकी एक आहे. क्षेत्ररक्षण करत असताना त्याने एकापेक्षा एक भन्नाट झेल घेतले आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात त्याने जोस इंग्लिसचा शानदार झेल घेतला. हा झेल घेताच विराटने इतिहास रचला आहे.

रविंद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर विराटने सोपा झेल घेतला. हा सोपा झेल घेताच विराटने ३३५ झेल पूर्ण केले आहेत. यासह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने राहुल द्रविडला मागे सोडलं आहे. विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५४९ व्या सामन्यात हा कारनामा करुन दाखवला आहे.

विराट कोहली हा भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होता. राहुल द्रविडने ५०४ सामन्यांमध्ये ३३४ झेल टीपले होते. फलंदाजीत अनेक रेकॉर्डमध्ये मोडून काढणाऱ्या विराटने आता क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेला साखळी फेरीतील शेवटचा सामना हा विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० वा सामना होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हा विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०१ वा सामना होता. विराटने आतापर्यंत आपल्या वनडे कारकिर्दीत १५९ झेल टीपले आहेत.

विराटने मोहम्मद अझहरुद्दीन यांचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा रेकॉर्ड देखील मोडून काढला आहे. त्यांच्या नावे १५६ झेल घेण्याची नोंद आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये विराटने १२१ झेल घेतले आहेत. तर १२५ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ५४ झेल घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आपचं धूळफेक आंदोलन

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT