pat cummins twitter
Sports

Pat Cummins: कमिन्सच्या मुलाने असं काही केलं की प्रेस कॉन्फ्रेन्स थांबवावी लागली; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Pat Cummins Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेनंतर कमिन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले होते.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने १० वर्षानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी परत मिळवली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कमिन्ससोबत मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पॅट कमिन्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पॅट कमिन्स पत्रकार परिषदेत येतो. तो पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत असतो. त्यावेळी त्याची नजर त्याच्या मुलावर पडते. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

पत्रकार परिषद सुरू असतानाच त्याला काहीतरी बोलायचं होतं. त्यानंतर कमिन्सनेही त्याच्याकडे पाहून त्याला स्माईल दिली आणि म्हणाला, ' मी फ्री आहे..' हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या मालिकेत कर्णधार म्हणून आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून दमदार कामगिरी केली. जेव्हा जेव्हा संघाला विकेट्सची गरज होती, तेव्हा त्याने संघासाठी विकेट्स काढून दिल्या. तर जेव्हा जेव्हा धावा करायच्या होत्या. तेव्हा महत्वपूर्ण धावाही केल्या. या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी राहिला.

ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १८५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला १८१ धवांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने ४ धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात भारतीय संघाने १५७ धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून सोपा विजय मिळवला. यासह कसोटी मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT