virat kohli with shubman gill saam tv
Sports

Shubman Gill: शुभमन गिल परदेशातही बनणार किंग कोहलीचा वारसदार? काय सांगते आकडेवारी?

Shubman Gill Record: शुभमन गिलकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. दरम्यान त्याचा मायदेशात आणि परदेशात खेळताना कसा राहिलाय रेकॉर्ड ? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहीलं जात आहे. शुभमन गिल ऑस्ट्रेलिया दौरा कधीच विसरु शकणार नाही. कारण त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलिया दौऱ्याहूनच झाली होती. त्याच फलंदाजीतील कौशल्य आणि लिडरशीप स्किल्स पाहता त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली गेली होती.

भारताचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२०-२१ मध्ये पार पडला होता. या दौऱ्यावर अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते.तर युवा खेळाडूंना घेऊन ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूंना आव्हान देण्यासाठी मैदानात उतरायचं होतं.

गिलला मोहम्मद सिराजसोबत मेलबर्न कसोटीतून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणातच त्याने ४५ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर संघाला गरज असताना त्याने गाबाच्या मैदानावर ९१ धावांची खेळी केली होती.

गिलने ज्यावेळी कसोटी कारकिर्दीची सुरुवाच केली त्यावेळी तो सलामीला फलंदाजीला यायचा. गाबा आणि सिडनी कसोटीत गिलने शानदार खेळी केली होती. मात्र रिषभ पंतने केलेल्या खेळीमुळे गिलच्या खेळीची फार काही चर्चा झाली नाही. यशस्वी जयस्वालने डावाची सुरुवात केल्यापासून गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. गिलचा मायदेशात खेळताना दमदार रेकॉर्ड राहिला आहे. मात्र परदेशात खेळताना त्याला अजूनही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मायदेशात आणि परदेशात खेळताना गिलचा रेकॉर्ड कसा राहिलाय यावर एक नजर टाकूया.

कसा राहिला रेकॉर्ड?

गिलने एकूण ३० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३६.४५ च्या सरासरीने १८५९ धावा केल्या आहेत. ज्यात ५ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा भारतातील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने १७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४२.०३ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत.

गिलच्या नावे मायदेशात खेळताना ४ शतक आणि ५ अर्धशतक झळकावली आहेत. याउलट परदेशातील रेकॉर्ड पाहिला, तर त्याला १३ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने अवघ्या २९.६५ च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला १ शतक आणि २ अर्धशतकं झळकावता आली आहेत.

परदेशात खेळताना (प्रत्येक संघाविरुद्ध) कसा राहिलाय रेकॉर्ड?

इंग्लंड - ३ सामने, ८८ धावा

ऑस्ट्रेलिया- ४ सामने, ३१८ धावा

दक्षिण आफ्रिका- २ सामने , ७४ धावा

बांगलादेश- २ सामने, १५७ धावा

वेस्टइंडीज - २ सामने, ४५ धावा

सलामीला फलंदाजी करत असताना, गिलची सरासरी ढासळली होती. मात्र पुजारा संघाबाहेर झाल्यानंतर गिलला पाठवण्याचा धाडसी निर्णय योग्यच ठरला. सुरुवातीला या क्रमांकावर फलंदाजी करताना तो संघर्ष करत होता.

मात्र आता त्याच्या सरासरीत वाढ झाली आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने २७ इनिंगमध्ये ४१.०४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर सलामीला फलंदाजी करताना त्याची सरासरी २९ इनिंगमध्ये ३२.३७ इतकीच होती.

आता गिलला आपल्या संघातील स्थान टिकवून ठेवायचं असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्या चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT