हिटमॅनने घेतली KL Rahul ची मुलाखत; पहा Video Saam Tv
क्रीडा

KL Rahul: BCCI ची मोठी कारवाई; कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या खेळाडूला हटवलं

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे

Gangappa Pujari

BCCI: भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार के एल राहुलचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. केएल राहुलने गेल्या काही सामन्यांमध्ये बरीच निराशाजनक कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो आतापर्यंत कोणतीही खास कामगिरी करु शकला नाही.

नागपूर कसोटी सामन्यात तो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी दिल्ली कसोटी सामन्यात त्याच्या बॅटने पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात 1 धावा करून आऊट झाला. त्याच्या या खराब फॉर्ममुळेच बीसीसीआयने त्याला मोठा झटका दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीसीसीआयने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. मागच्या वेळी संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयने केएल राहुलचे नाव उपकर्णधार म्हणून ठेवले होते, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूसमोर उपकर्णधार लिहिलेले नाही. याचा अर्थ केएल राहुलची उपकर्णधार पदावरून हकालपट्टी झाली आहे.

के एल राहुलचे उपकर्णधार पद काढून घेतल्याने तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. शुभमन गिल फॉर्ममध्ये आहे, त्याला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.

कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी सोडण्यात आले.

मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये 1 ते 5 मार्च तर चौथा आणि शेवटचा सामना 9 ते 14 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे. या मालिकेत भारताकडे सध्या 2-0 अशी आघाडी आहे. तिसरा सामना जिंकल्याने टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT