Rohit Sharma after India’s win in Sydney — emotional statement sparks retirement speculation. saam tv
Sports

IND vs AUS: 'माहिती नाही आम्ही पुन्हा येणार...' सामना जिंकल्यानंतर रोहितनं दिले निवृत्तीचे संकेत

Rohit Sharma Hints at Retirement : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या रोमांचक विजयानंतर रोहित शर्मा काहीसा भावनीक झाला. त्याने माध्यमांशी बोलताना निवृत्तीचे संकेत दिलेत.

Bharat Jadhav

  • भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय झाला.

  • सामना जिंकल्यानंतर रोहितनं निवृत्तीचे संकेत दिले.

  • विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भागीदारीनं सामना जिंकला.

भारतीय क्रिकेट संघाने सिडनीमधील सामना जिंकलाय. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १२१ आणि विराट कोहलीनं नाबाद राहत ७४ धावा धाव केल्या. दोघांच्या धमाकेदार खेळीनं भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीचे संकेत दिलेत. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला २३६ धावांवरच रोखलं होतं. भारतानं ३८.८ षटकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार केले.

हे आव्हान पार करताना भारताने एक विकेट गमावली होती. यात डावात रोहितने नाबाद खेळी केली. त्याने १२५ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर कोहलीने ८१ चेंडूंचा सामना केला असून त्याने ७ चौकार मारले. या दोन्ही खेळाडूने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. सामना झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित शर्मानं निवृत्तीचे संकेत दिलेत.

'माहिती नाही आम्ही पुन्हा येणार की नाही'..

रोहितने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना हिटमॅन भावनिक झाला. त्याने भावनिकपणे विधान करताना निवृत्तीचे संकेत दिलेत. मला ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळणं आवडतं. माझ्या डोक्यात अजूनही २००८ची आठवण ताजी आहे. आता माहिती नाही आम्ही पु्न्हा ऑस्ट्रेलियाला परत येऊ का नाही. " आम्ही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, मग भले आम्हाला सन्मान मिळो किंवा नाही. आम्ही पर्थमध्ये नव्याने सुरुवात केली. मी गोष्टींकडे अशाच प्रकारे पाहतो. धन्यवाद, ऑस्ट्रेलिया."

दरम्यान रोहितला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रोहितने आज एकदिवशीय ३३ वं शतक पूर्ण केलं. तर तिन्ही फॉर्मेटमधून हे एकूण ५० वे आंतरराष्ट्रीय शतक होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे नववे शतक होते. दरम्यान रोहितला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रोहितचे हे एकूण ५० वे आंतरराष्ट्रीय शतक होते आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे नववे शतक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधूनही संघाबाहेर; कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?

BJP Congress Alliance: शिंदेंविरोधात भाजप-काँग्रेसची एकी, कोल्हापुरात कुस्तीत दोस्ती

मुंबईसाठी भाजपचा 'MY' फॉर्म्युला, महिला, युवकांची मतं मिळवण्यासाठी रणनीती

SCROLL FOR NEXT