Sports

IND vs AUS 3rd T20 : टी -२० मालिका सुरू असतानाच टीम इंडियाचा स्टार चढणार बोहल्यावर; BCCIकडे मागितली सुट्टी

IND vs AUS: गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघातून मुक्त करण्याची विनंती मुकेश कुमार याने बीसीसीआयकडे केली होती.

Bharat Jadhav

IND vs AUS: 3rd T20I:

भारत आणि आस्ट्रेलियाच्या संघात तिसरा टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने बीसीसीआयकडे सुट्टीचा अर्ज केलाय. ऐन सामन्याच्या आधी सुट्टीसाठी अर्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण मुकेश कुमार हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सामना खेळण्यासाठी जाणार आहे.(Latest News)

आज दोन्ही संघात तिसरा टी२० सामना खेळला जात आहे. या सामनाआधी भारतीय संघाचा खेळाडू् मुकेश कुमार याने सुट्टी मिळण्यासाठी अर्ज केला. लग्नासाठी आपल्याला सुट्टी द्यावी, अशी विनंती केली होती. दरम्यान बीसीसीआयने त्याची रजा मान्य केलीय. भारतीय संघ व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मुकेश कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलंय. तर उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश करण्यात आलाय. याविषयीची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) X वर दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न समारोहासाठी रजा घेतलेला मुकेश कुमार घराकडे परतलाय. मुकेश कुमारने विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम येथे पहिले दोन T20 सामने खेळलेत, त्यात त्याने एक विकेट घेतलीय. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी भारतीय संघातून मुक्त करण्याची विनंती BCCIकडे केली.

मुकेश हा रायपूर येथे होणाऱ्या चौथ्या टी२० सामन्यासाठी तो उपस्थित असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाच दिवसीय टी२० सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने २-०ने आघाडी घेतलीय. तर आज गुवाहाटी येथे होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी मुकेश कुमारच्या जागेवर आवेश खानला संघात घेण्यात आलंय.

सामन्याआधी झालेल्या नाणेफेक आधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मुकेश कुमारच्या लग्नाची शुभवार्ता दिली. आजच्या सामन्यासाठी आम्ही बदल केलाय. मुकेश कुमारच्या जागेवर आवेश खानला संघात घेण्यात आलंय. कारण मुकेश त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा सामना खेळणार आहे. तो लग्न करतोय, आमच्या संघाकडून त्याला शुभेच्छा असं कर्णधार सूर्यकुमार म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT