Laser Show Of Kolhapur In World Cup Final Saamtv
क्रीडा

World Cup Final 2023: मोदी स्टेडियमवर दिसणार कोल्हापुरकरांचा झगमगाट; वर्ल्डकप सामन्यात खास लेसर शो ठरणार आकर्षण

Laser Show Of Kolhapur In World Cup Final: सामन्याआधी कोल्हापुरकरांचे खास लेसर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे.

Gangappa Pujari

ind Vs Aus Word Cup Final 2023 :

गेल्या महिन्यांपासून सुरू असलेला विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आलायं. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करत रोहित सेना विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली असून बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी अंतिम मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी कोल्हापुरकरांचे खास लेसर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी कमालीची उंचावली असून भारतच जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. त्याआधी स्टेडियमवर खास डीम व ग्राफिक शो पाहायला मिळणार आहे, जो कोल्हापुरचे (Kolhapur) दोन तरुण दाखवणार आहेत.

अमित पाटील व रामकृष्ण वागराळे अशी या तरुणाची नावे आहेत. २०११ ला सुरू केलेल्या लाईटच्या व्यवसायात त्यांनी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अहमदाबादमधील फाइनल मॅचसाठी दिल्लीच्या हेड वे क्रिएशन या कंपनीसोबत हा शो सादर केला जाणार आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या शोमध्ये ६० वॅट या क्षमतेचे ४० लेसर लावण्यात येणार आहेत. हा एक विक्रम असून यापूर्वी कधीही एका वेळेला मैदानावर ४० लेसरचा झगमगाट पाहायला मिळाला नाही. या लेसर शो साठी योगेश चौधरी, अमित पाटील (अमित पाटील लाईट्स), रामकृष्ण वागराळे (आर.के.लेझर्स), सागर पाटील, अभिषेक हांडे, रोहित कदम, उदय साळोखे, विनोद हाजुराणी, रवीकुमार, गणेश तटकरे यांची टीम मैदानावर कार्यरत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT