jasprit bumrah twitter
Sports

IND vs AUS: नॉर्मल वाटलोय का.. कॉन्टास पुन्हा एकदा नडला, मग बुमराहने पुढच्याच बॉलवर असा काढला राग - VIDEO

Jasprit Bumrah vs Sam Kontas: सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे.या सामन्यात पुन्हा एकदा बुमराहने सॅम कॉन्टासला अद्दल घडवली आहे.

Ankush Dhavre

सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.

कॉन्टास नडला अन् बुमराहने ख्वाजाचा काटा काढला

Jasprit bumrah took wicket of usman khawaja भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे काही षटक खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्टास ही जोडी मैदानावर आली. ऑस्ट्रेलियाचा संघ विकेट वाचवण्याच्या प्रयन्यात होता. यादरम्यान कॉन्टास आणि बुमराह यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उस्मान ख्वाजा बाद होऊन माघारी परतला.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी उस्मान ख्वाजा स्ट्राईकवर होता. बुमराह गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र उस्मान ख्वाजा स्ट्राईक घेताना मुद्दाम वेळ वाया घालवत होता.

बुमराह ३ वेळा रनअपवर आला, मात्र तरीही तो तयार नव्हता. त्यावेळी बुमराहने ख्वाजाला जाब विचारला. बुमराह आणि ख्वाजाच्या वादात कॉन्टासने उडी घेतली.

बुमराह आणि कॉन्टास बाचाबाची झाली, त्यावेळी अंपायरने हा वाद मिटवला. मात्र पुढच्याच चेंडूवर बुमराहने ख्वाजाला झेलबाद करत माघारी धाडलं. ख्वाजा बाद होताच बुमराहने आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसून आला. तो कॉन्टासच्या अंगावर धावून गेला. आता दुसऱ्या दिवशी बुमराह आणि कॉन्टास यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळू शकते. १८५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT