rohit sharma 
Sports

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचं हे चुकलंच! बॉर्डर- गावसकर ट्रॉफी आधी ऑस्ट्रेलियाकडून रोहित शर्माचा अपमान?

Australian Media Poster For Perth Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी एक पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात विराटचा कर्णधार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे

Ankush Dhavre

Border -Gavaskar Trophy: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी -२० मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये रंगणार आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही आपला संघ जाहीर केला आहे. मात्र एका पोस्टरमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनल फॉक्स क्रिकेटवर एक पोस्टर झळकलं, जे सध्या तुफान चर्चेत आहे.

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान बॉर्डर गावसकर ट्रॉफीची चर्चा सुरू होती. त्यावेळी झळकावण्यात आलेल्या पोस्टरवर पॅट कमिन्ससोबत विराट कोहलीचा फोटो लावण्यात आला. हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

फॉक्स क्रिकेटच्या या चुकीमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काहींच्या मते हा कर्णधार रोहित शर्माचा अपमान आहे. एका युझरने लिहिले की, ' हा आमच्या कर्णधाराचा अपमान आहे. फॉक्स क्रिकेटला माहीत आहे की, भारतीय क्रिकेटचा खरा चेहरा कोण आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दाम विराटचा फोटो लावला.'

रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर त्याने म्हटलं होतं की, तो पहिल्या कसोटी सामन्यासाठी कदाचित उपलब्ध नसेल. माध्यमातील वृत्तानुसार , तो आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी उपलब्ध नसेल. मात्र रोहित शर्मा उपलब्ध नसणार, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT