Virat Kohli scored a century
Virat Kohli scored a century  saam tv
क्रीडा | IPL

Video : उगाच किंग नाही विराट! शतक झळकावताच स्टेडियममध्ये दिसला अद्भुत नजारा; टाळ्यांचा कडकडाट, चाहते नतमस्तक

Chandrakant Jagtap

Virat Kohli Century Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवला. विराटने 1205 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. यापूर्वी भारतीय त्याने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डन्सवर 136 धावांची खेळी केली होती.

विराटसोबतच त्याचे चाहतेही या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते. कोहलीच्या या शतकामुळे भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे. या शतकानंतर स्टेडियममध्ये एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. तीन वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावल्यानंतर कोहलीही खूप आनंदी दिसत होता.

कोहलीने नॅथन लियॉनच्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. विराटने संयमी खेळी खेळत 240 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकानंतर संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाट झाला. (Latest Sports News)

प्रेक्षकही कोहलीचे शतक साजरे करत होते. अनेक प्रेक्षकांनी विराटला वाकून नमस्कार केला. एवढंच नाही तर विरोधी संघातील खेळाडूंनीही विराटचे शतकाला टाळ्या वाजवून दाद दिली. विराटच्या शतकानंतर संपूर्ण मैदान कोहली... कोहली... नावाने गुंजले होते.

विराट कोहलीच्या नाबाद शतकामुळे भारतीय संघाने चहापानापर्यंत 5 गडी गमावून 472 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने सकाळच्या सत्रात 28 धावांवर बाद झालेल्या रवींद्र जडेजाची विकेट गमावली. उपाहाराला कोहली 88 धावांवर खेळत होता. उपाहारानंतर कोहलीने शानदार खेळ करत आपले शतक पूर्ण केले. कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

SCROLL FOR NEXT