washignton sundar twitter
Sports

IND vs AUS: Snicko की जय हो..! आधी राहुल, जयस्वाल अन् आता सुंदर; आऊट नसतानाही जावं लागलं बाहेर?

Washington Sundar News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातही स्निकोमीटरमुळे नवा वाद पेटला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेला कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने या सामन्यात मोठा बदल केला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माला बसवून ही जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के बसले. मात्र शेवटी रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सांभाळला. रिषभ पंत ४० धावांवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने ३० चेंडूंचा सामना करत १४ धावांची खेळी केली.

वॉशिंग्टन सुंदरलाही Snickometer नडला

washington sundar given out because of snickometer error या संपूर्ण मालिकेत स्निकोमीटर चर्चेचा विषय ठरला आहे. आधी केएल राहुल, त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि आता वॉशिंग्टन सुंदर, या तिघांनाही स्निकोमीटरने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. गेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालला अशा पद्धतीने बाद घोषित केलं गेलं होतं. आता वॉशिंग्टन सुंदरला बाद घोषित करण्यात आलं आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाचा पहिला डाव सुरु असताना, ऑस्ट्रेलियाकडून ६६ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर स्ट्राईकवर होता. कमिन्सने लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला.

या चेंडूवर सुंदरने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. कमिन्सने जोरदार अपील केली. मात्र अंपायरने ही अपील फेटाळून लावली. त्यानंतर त्याने डीआरएसची मागणी केली.

डीआरएस पाहून अंपायरने निर्णय देण्यात बराच वेळ घेतला. सॉफ्ट सिग्लन नॉटआऊट होता. अंपायरने रिप्लेमध्ये पाहिलं त्यावेळी चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला आहे, असं दिसून आलं नाही. पुन्हा एकदा स्निको मीटरची मदत घेण्यात आली. स्निको मीटरमध्ये पाहिलं असता, चेंडू आणि ग्लोव्ह्जचा संपर्क होण्यापूर्वीच स्पार्क होत असल्याचं दिसून आलं.

जेव्हा चेंडू ग्लोव्ह्जच्या जवळ पोहोचला तेव्हाही तसाच स्पार्क होताना दिसला,जसा चेंडू दूर असताना होत होता. तरीदेखील अंपायरने त्याला बाद घोषित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सुंदर नाराज असल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT