rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: विराटच्या विकेटवरुन पेटला वाद! स्मिथने कॅच घेतला, पण पुढे नेमकं काय घडलं?

Virat Kohli Wicket News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली आहे. भारतीय संघ २ मोठ्या बदलांसह मैदानात उतरला आहे. कर्णधार रोहित शर्माने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आकाश दीप दुखापतीमुळे बाहेर बसला आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. भारताकडून विराट कोहली फलंदाजीला आल्यानंतर ऑस्ट्रेलियन फॅन्सकडून जोरदार हुटिंग करण्यात आलं. तर भारतीय फॅन्स त्याला चिअर करताना दिसून आले. दरम्यान मैदानात येताच त्याला स्वस्तात माघारी परतावं लागलं. त्याच्या कॅचवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Virat Kohli Catch

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला ८ व्या षटकात २ मोठे धक्के बसले. त्यानंतर विराट कोहलीला मैदानात यावं लागलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट नवीन चेंडूवर खेळताना संघर्ष करताना दिसतोय. पहिल्याच चेंडूवर चेंडू बॅटची कडा घेऊन दुसऱ्या स्लीपच्या हातात गेला.

Steve Smith Took Catch Of Virat Kohli

चेंडू खूप खालून गेला. स्लीपमध्ये असलेल्या स्मिथने हा झेल जमिनीतून खोदून काढला आणि हवेत उडवला. त्यावेळी गलीमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने सोपा झेल घेतला. हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्यात आला आणि निर्णय तर धक्कादायक होता.

निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला असता असं दिसून आलं की, हा चेंडू जमिनीला स्पर्श होऊन हातात आला होता. अंपायरने घेतलेल्या या निर्णयावरून स्टीव्ह स्मिथ नाराज असल्याचं दिसून आलं. झेल घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन फॅन्स खुश झाले होते. तर नॉटआऊटचा निर्णय येतात भारतीय फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT