Jasprit Bumrah Saam Tv
Sports

Jasprit Bumrah Record: जे ४७ वर्षांत कोणालाच नाही जमलं ते बुमराहने करुन दाखवलं; मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

Jasprit Bumrah Record News: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने दिग्गज खेळाडूला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला आहे.

रोहितला विश्रांती दिल्यानंतर कसोटी संघाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या बुमराहने सामन्यातील दुसऱ्या दिवशीही दमदार सुरुवात केली. या डावात गोलंदाजी करताना मार्नस लाबुशेनला बाद करताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळताना एकाच मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने बिशन सिंग बेदी यांना मागे सोडलं आहे. या मालिकेत गोलंदाजी करताना त्याने ३ वेळा ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याने या मालिकेत ३२ हून अधिक गडी बाद केले आहेत.

यापूर्वी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळताना एकाच मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा बिशन सिंग बेदी यांच्या नावावर होता. यापूर्वी १९७७/७८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ३१ गडी बाद केले होते. बुमराहने सामन्यातील पहिल्याच दिवशी ख्वाजाला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाबुशेनला बाद करताच त्याने हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासह बुमराहने ४७ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

जसप्रीत बुमराह - ३२ गडी ,२०२४-२५

बिशन सिंग बेदी - ३१ गडी, १९७७-७८

बीएस चंद्रशेखर - २८ गडी, १९७७-७८

ईएएस प्रसन्ना - २५ गडी , १९६७-६८

कपिल देव - २५ गडी, १९९१-९२

भारतीय संघाने केल्या १८५ धावा

भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २६, जसप्रीत बुमराहने २२ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT