Ind vs aus BCCI (X)
Sports

IND vs AUS,BGT: बुमराह एकटाच नडला! रोहित- विराट फ्लॉप, नवखा रेड्डी सुसाट; 11 खेळाडूंचं रिपोर्टकार्ड

Indian Players Performance In Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेत कशी राहिली भारतीय खेळाडूंची कामगिरी? पाहा रिपोर्टकार्ड

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६१ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाकडे ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी होती. तर ऑस्ट्रेलियाकडे मालिका जिंकून १० वर्षांची प्रतिक्षा संपवण्याची संधी होती.

ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना सोडला, तर उर्वरीत चारही सामन्यांमध्ये चॅम्पियनसारखा खेळ केला आणि ही मालिका आपल्या नावावर केली. एकीकडे ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं. तर दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू हातची संधी घालवताना दिसून आले.

भारताकडून फलंदाजीत यशश्वी जयस्वाल आणि नितीश कुमार रेड्डीला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह शेवटपर्यंत लढला.

सिराजने त्याला साथ दिली, मात्र तिसऱ्या वेगवान गोलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. बुमराहने या मालिकेत सर्वाधिक ३२ गडी बाद केले. यासह त्याने या मालिकेतील प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला. दरम्यान या संपूर्ण मालिकेत कशी राहिली भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरी? पाहा रिपोर्ट कार्ड.

यशस्वी- रेड्डीचा हिट शो

यशस्वी जयस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी, दोघांचाही पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. यशस्वीकडे कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव होता. मात्र नितीश रेड्डी पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला.

तरीदेखील दोघेही या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ३९१ धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने १ शतकी खेळीसह २९८ धावा केल्या. यासह केएल राहुलने फलंदाजी करताना २७६ धावा केल्या. हे तिन्ही फलंदाज सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये राहिले.

अशी राहिली भारतीय फलंदाजांची कामगिरी

रोहित शर्मा - ३१ धावा

यशस्वी जयस्वाल - ३९१ धावा

केएल राहुल - २७६ धावा

विराट कोहली - १९० धावा

शुभमन गिल - ९३ धावा

नितीश रेड्डी - २९८ धावा

रिषभ पंत -२७६ धावा

या मालिकेत कशी राहिली गोलंदाजांची कामगिरी

या संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बुमराहने या मालिकेत गोलंदाजी करताना सर्वाधिक ३२ गडी बाद केले. यापूर्वी कुठल्याही भारतीय गोलंदाजाला ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना अशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला साथ देत मोहम्मद सिराजने २० गडी बाद केले.

या मालिकेत भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

जसप्रीत बुमराह - ३२ गडी

मोहम्मद सिराज - २० गडी

प्रसिद्ध कृष्णा - ६ गडी

आकाश दीप -५

नितीश रेड्डी - ५

रविंद्र जडेजा- ४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT