IND vs AUS 5th Test: एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली

India vs Australia 5th Test, Border- Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली
australiatwitter
Published On

गेली एक दशक भारतीय संघाने जे वर्चस्व निर्माण केलं होतं, ते अखेर संपुष्टात आलं आहे. भारतीय संघाला बॉर्डर गावसकर मालिका ३-१ ने गमवावी लागली आहे. भारतीय संघाने सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण करत ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली
IND vs AUS 5th Test: ओय कॉन्टास, शॉट नाही लागत का?; जयस्वालचा हिंदी तडका, मैदानातच स्लेजिंगचा भडका, VIDEO

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला अवघ्या १८५ धावा करता आल्या. फलंदाज फ्लॉप ठरले. मात्र त्यानंतर गोलंदाजी करताना गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला.

भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि नितीश रेड्डीला २-२ गडी बाद करता आले.

एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली
IND vs AUS 5th Test: रिषभ पंत एकटाच लढला, दुसऱ्या बाजूला कुणीच नाय नडला! टीम इंडियाच्या गटांगळ्या सुरुच; स्कोअरकार्ड

ऑस्ट्रेलियाने केल्या १८१ धावा

पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला अवघ्या १८१ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना पहिलाच सामना खेळत असलेल्या वेबस्टरने ५७ धावांची खेळी केली. इतर कुठलाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली
IND vs AUS 5th Test: रिषभ पंत एकटाच लढला, दुसऱ्या बाजूला कुणीच नाय नडला! टीम इंडियाच्या गटांगळ्या सुरुच; स्कोअरकार्ड

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप

भारतीय संघाला दुसऱ्या डावात ४ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या डावात चांगली फलंदाजी करून ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान ठेवण्याची संधी होती. मात्र ही संधीही भारतीय फलंदाजांनी गमावली.

एकट्या रिषभ पंतला सोडलं तर कुठलाही फलंदाज ५० धावांच्या जवळपासही पोहचू शकला नाही. रिषभने ६१ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने २२, केएल राहुल १३, शुभमन गिलने १३ धावांची खेळी केली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचे आव्हान ठेवले होते. बुमराहच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण करत विजय मिळवला आणि मालिकाही जिंकली.

एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली
IND vs AUS 5th Test Day 1: टीम इंडियाचा १८५ धावांवर पॅकअप! बुमराह बॅटिंगमध्येही चमकला

भारतीय संघाचं एक दशकाचं वर्चस्व संपुष्टात

ऑस्ट्रेलिया - २०२४-२५, विजेता संघ ऑस्ट्रेलिया ( ३-१)

ऑस्ट्रेलिया, २०१४-१५ - विजेता संघ ऑस्ट्रेलिया (२-०)

भारत २०१६-१७ - विजेता संघ भारत(२-१)

ऑस्ट्रेलिया २०१८-१९ - विजेता संघ भारत (२-१)

ऑस्ट्रेलिया २०२१-२२ - विजेता संघ भारत (२-१)

भारत २०२२-२३- विजेता संघ भारत (२-१)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com