jasprit bumrah twitter
Sports

IND vs AUS 5th Test Day 1: टीम इंडियाचा १८५ धावांवर पॅकअप! बुमराह बॅटिंगमध्येही चमकला

India vs Australia 5th Test, Day 1: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपल आहे. या सामन्यातही भारतीय संघातील फलंदाज फ्लॉप ठरले. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार फलंदाजी केली.

या सामन्यात रोहित शर्माला संधी दिली गेली नव्हती. रोहितला प्लेइंग ११ मधून बाहेर केल्यानंतर त्याच्य जागी शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली. तर नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली. सुरुवातीच्या ४ सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी केएल राहुल आणिा यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली. मात्र भारताला अवघ्या ११ धावांवर पहिला धक्का बसला. केएल राहुल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला.

त्यानंतर यशस्वी जयस्वाल अवघ्या १० धावा करत माघारी परतला. सलामी जोडी फुटल्यानंतर, शुभमन गिल आणि विराट कोहली मिळून डाव सांभाळला. मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. गिल २० तर विराट २७ धावांवर तंबूत परतला.

भारताकडून रिषभ पंत सर्वात यशश्वी फलंदाज ठरला. त्याने ४० धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २६ आणि वॉशिंग्टन सुंदरने १४ धावांची खेळी केली. शेवटी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. बुमराहने २२ धावांची खेळी करत संघाचा डाव १८५ वर पोहोचवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

SCROLL FOR NEXT