team-india saam tv news
Sports

Ind vs Aus 5th T20 Playing 11: अखेरच्या टी-२० सामन्यात टीम इंडियात बदल निश्चित! रिंकू सिंगच्या जागी या खेळाडूला मिळणार स्थान

Ind vs Aus 5th T20 Match Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus 5th t20 Match Prediction:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातील प्लेइंग ११ मध्ये बदल होणं निश्चित आहे. गेल्या सामन्यात भारतीय संघात ४ बदल करण्यात आले होते. या सामन्यातही एक मोठा बदल केला जाऊ शकतो.

या फलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यातही यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. या दोघांनीही या मालिकेत दमदार खेळ केला आहे. दरम्यान शेवटच्या सामन्यातही या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

या सामन्यात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून या सामन्यातही जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

ही मालिका तर भारतीय संघाने जिंकली आहे. त्यामुळे रिंकू सिंगला विश्रांती देऊन शिवम दुबेला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेलपैकी एका खेळाडूला संधी मिळू शकते.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

फिरकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोईला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमारला संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रिंकू सिंग/शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, दिपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलिया :

जोश फिलिप, ट्रेविस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टीम डेविड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक/कर्णधार), बेन ड्वारशुइस, केन रिचर्डसन/नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर सांघा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT