IND vs AUS सामन्याआधीच स्टेडियमची बत्ती गुल! तब्बल इतक्या कोटींचं बिल थकवलं

Raipur Stadium Electricity Bill: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना आज रायपुरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे
raipur-cricket-team
raipur-cricket-teamsaam tv news
Published On

IND vs AUS 4th T20I:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना आज रायपुरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सामन्याच्या काही तासांपुर्वीच स्टेडियमचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. स्टेडियम प्रशासनाने वीज बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा चौथा टी-२० सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर आतापर्यंत अनेक आतंरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत.

दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना देखील याच मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी एक अडथळा निर्माण झाला आहे. सामना सुरु होण्याच्या काही तासांपुर्वीच स्टेडियमची बत्ती गुल करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षांपासून स्टेडियम प्रशासनाने वीज बिल थकवलं आहे. या बिलची रक्कम आता ३.१६ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. (Latest sports updates)

raipur-cricket-team
IND vs AUS, Weather Report: भारत- ऑस्ट्रेलिया टी-२० सामना पावसामुळे वाहून जाणार का? पावसाबाबत समोर आली मोठी अपडेट

वीच बिल न भरल्याने ५ वर्षांपूर्वी स्टेडियमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनने विनंती केल्यानंतर स्टेडियमसाठी तात्पुरता कनेक्शन स्थापित करण्यात आलं आहे. मात्र त्यामुळे केवळ प्रेक्षक गॅलरी आण पॅव्हेलियन बॉक्स इतकच कव्हर करता येत होतं. आज होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान प्लड लाईट्स जनरेटरच्या वापराने चालवाव्या लागतील.

या स्टेडियममध्ये २०१८ मध्ये हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ज्यावेळी धावपटूंना कळालं की, या स्टेडियमचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे, त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर खुलासा करण्यात आला होता की, २००९ पासून पासून स्टेडियमचं बिल भरलेलं नाही.

raipur-cricket-team
Ind vs Aus 4th T20 Playing 11: रोहितच्या खास भिडूला सूर्यकुमार दाखवणार बाहेरचा रस्ता; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com