virat kohli twitter
Sports

IND vs AUS 4th Test: अवघ्या ५ मिनिटात सामना फिरला! जयस्वालची ती एक चूक टीम इंडियाला महागात पडली

India vs Australia 4th Test, Day 2: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. या साामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघ ३१० धावांनी पिछाडीवर आहे.

Ankush Dhavre

मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा थरार सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा भलामोठा डोंगर उभारला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सुरुवातीलाच भारताला २ मोठे धक्के बसले. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी मिळून डाव सावरला. मात्र यशस्वी जयस्वालच्या एका चुकीमुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेने फिरला. काय घडलं त्या ५ मिनिटात? जाणून घ्या.

भारतीय संघ जेव्हा फलंदाजीला आला, त्यावेळी भारतीय संघाला ४७४ धावांचा डोंगर सर करायचा होता. भारताकडून फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली.

मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. भारताला अवघ्या ८ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने मिळून डाव सावरला. मात्र दुसऱ्या सेशनच्या शेवटच्या चेंडूवर केएल राहुल बाद होऊन माघारी परतला.

विराट-जयस्वालने सावरला डाव

भारताला सुरुवातीला २ धक्के बसल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून १०२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

जयस्वालने अर्धशतकी खेळी केल्यानंतर, त्याची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. मात्र स्कॉट बोलँडच्या षटकात यशस्वी जयस्वालने शॉट मारल्यानंतर, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र विराटने धाव घेण्यासाी पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वालला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. जयस्वाल ८२ धावांची खेळी करत माघारी परतला.

यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर, विराट कोहलीवर डाव सांभाळण्याची जबाबदारी हबोती. मात्र पुढच्याच षटकात तो स्कॉट बोलँडच्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतला. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ५ गडी बाद १६४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT