Virat Kohli, IND vs AUS: विराटला ती चूक महागात पडणार! ICC कारवाई करणार, काय सांगतो नियम?

ICC Fine On Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि सॅम काँटास भिडल्याचे पाहायला मिळाले आहे
Virat Kohli, IND vs AUS: विराटला ती चूक महागात पडणार! ICC कारवाई करणार, काय सांगतो नियम?
virat kohlitwitter
Published On

मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरु आहे. या बॉक्सिंग डे कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून सॅम काँटासला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या डावात फलंदाजी करताना विराट आणि सॅम काँटास भिडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दरम्यान सॅम काँटासला धडक दिल्यामुळे आता आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करु शकते.

Virat Kohli, IND vs AUS: विराटला ती चूक महागात पडणार! ICC कारवाई करणार, काय सांगतो नियम?
IND vs AUS: लाईव्ह सामन्यात विराट- काँटास भिडले! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि सॅम काँटास ही जोडी मैदानावर आली.

Virat Kohli, IND vs AUS: विराटला ती चूक महागात पडणार! ICC कारवाई करणार, काय सांगतो नियम?
IND vs AUS: बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता; नवख्या सॅम कॉन्स्टन्सने बुमराहच्याही आणले नाकीनऊ

दोघांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यावेळी ११ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. सॅम काँटास हा बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार षटकारांचा पाऊस पाडत होता. याच षटकात चेंडूला शाईन करत असताना विराट,सॅम काँटासला धडकला. दोघांमध्ये जोरदार धडक झाली.

Virat Kohli, IND vs AUS: विराटला ती चूक महागात पडणार! ICC कारवाई करणार, काय सांगतो नियम?
IND vs AUS: ...म्हणून शुभमन गिलला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं! खरं कारण आलं समोर

काय सांगतो ICCचा नियम?

आयसीसीच्या नियमानुसार, एखादा खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदस्य, अंपायर किंवा मॅच रेफरी कुठल्याही खेळाळूच्या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, तर त्याला शिक्षा केली जाऊ शकते. क्रिकेट इतिहासात यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

या घटनेनंतर विराटला एका सामन्याची बंदी किंवा फार मोठी अशी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. फार फार तर त्याच्या मॅच फीवर फाईन लावला जाऊ शकतो किंवा डिमेरीट पॉईंटही दिला जाऊ शकतो.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सॅम काँटास आणि उस्मान ख्वाजाने भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली.

आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या सॅम काँटासने दमदार ६० धावांची खेळी केली. तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com