Team india  Saam tv
क्रीडा

IND vs AUS 3rd Test: इंदोर कसोटीत मोडले जाणार मोठे विक्रम! अश्विन, जडेजा अन् सिराजकडे इतिहास रचण्याची संधी

भारतीय संघ ज्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळी आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना मोठे विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS 3rd Test records: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत २-० ची आघाडी घेतली आहे.

मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने (Team India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ ज्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळी आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना मोठे विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. (Latest Sports updates)

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या जोरदार कामगिरी करतोय. तिसऱ्या कसोटीत त्याला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. रवींद्र जडेजा या सामन्यात १ गडी बाद करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करणारा आणि ५००० धावा करणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरणार आहे.

यापूर्वी केवळ कपिल देव यांना हा कारनामा करता आला आहे. आतापर्यंत रवींद्र जडेजाने ४९९ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने, ५५२३ धावा केल्या आहेत.

तसेच इंदोर कसोटीत २ गडी बाद करताच आर अश्विनच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. त्याच्याकडे भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज बनण्याची संधी असणार आहे.

याबाबतीत तो कपिल देव यांना मागे सोडणार आहे. आतापर्यंत आर अश्विनने ६८६ गडी बाद केले आहेत. तर कपिल देव यांच्या नावे ६८७ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर ७०७ गडी बाद करण्यासह हरभजन सिंग दुसऱ्या स्थानी आहे. तसेच ९५३ गडी बाद करण्यासह अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या सामन्यात ४ गडी बाद करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी पूर्ण करणार आहे. असा कारनामा करणारा तो ४९ वा भारतीय गोलंदाज ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT