Ind vs aus Saam tv
Sports

IND VS AUS 3rd test: इंदूरचा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला .. गेल्या ११ वर्षात पाचव्यांदाच घडलंय असं काही

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघांने ९ गडी राखून विजय मिळवत भारताची मालिका जिंकण्याची प्रतीक्षा आणखी वाढवली आहे

Ankush Dhavre

IND VS AUS indore test : भारतीय संघ जेव्हा इंदूरमध्ये दाखल झाला त्यावेळी असे वाटले होते की, भारतीय संघ इंदूर कसोटी सामना जिंकून ही मालिका आपल्या नावावर करणार.

मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघांने ९ गडी राखून विजय मिळवत भारताची मालिका जिंकण्याची प्रतीक्षा आणखी वाढवली आहे. तसेच भारतीय संघाच्या चिंतेत देखील भर घातली आहे.

मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने जर जिंकला तर ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त होईल.

यासह भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग आणखी कठीण होऊ शकतो. मात्र इंदूर कसोटी सामन्यातील विजय देखील ऑस्ट्रेलिया संघासाठी खास आहे. ऑस्ट्रेलिया संघाने असं काही करून दाखवलं आहे जे खूप खूप कमी संघांना करता आलं आहे. (Latest sports updates)

भारतात येऊन भारतीय संघाला पराभूत करणं खूप मोठी गोष्ट आहे. हा कारनामा आता स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने करून दाखवला आहे. हा गेल्या ११ वर्षातील भारतीय संघाचा पाचवा पराभव आहे. यापूर्वी २०१२-१३ मध्ये भारतीय संघाने ४ कसोटी सामने गमावले होते.

जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंड संघ २०२१ मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. या मालिकेत चेन्नईच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला होता. मात्र या संनयनानंतर इंग्लंड संघाला एकही सामना जिंकता आला नव्हता. ही मालिका इंग्लंड संघाला गमवावी लागली होती.

यापूर्वी २०१६ मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुण्याच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने हा सामना गमावला होता. त्यावेळी देखील स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. तर यावेळी देखील भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे.

तसेच २०१२ मध्ये देखील भारतीय संघाला मायदेशात पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१२ मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यावर भारतीय संघाचा ईडन गार्डन्सच्या मैदानावर ७ गडी राखून पराभव झाला होता. तर या सामन्यापूर्वी झालेल्या मुंबई कसोटीत देखील भारतीय संघ पराभूत झाला होता. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने गमावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT