IND Vs AUS 3rd Test: कांगारूंचा पलटवार इंदूर कसोटी जिंकत मालिकेत २-१ ने केलं कमबॅक

ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७६ धावांची गरज होती. हे आव्हान सहजरित्या पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-१ ने कमबॅक केले आहे.
Ind vs aus
Ind vs aus Saam tv
Published On

IND Vs AUS 3rd Test: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७६ धावांची गरज होती. हे आव्हान सहजरित्या पूर्ण करत ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-१ ने कमबॅक केले आहे.(Latest sports updates)

भारतीय फलंदाजांची फ्लॉप कामगिरी..

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण पहिल्या षटकापासूनच ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर भारी पडल्याचे दिसून आले. (Ind vs Aus)

Ind vs aus
IND VS AUS: विराट सलग पाचव्यांदा ठरला फेल .. ऑस्ट्रेलियाच्या २ नवख्या खेळाडूंनी मिळून केला विराटचा 'गेम'

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात भारतीय संघाकडून विराटने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने २१, केएस भरतने १७, उमेश यादवने १७, अक्षर पटेल आणि रोहितने प्रत्येकी १२-१२ धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात..

ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज अडचणीचा सामना करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टीचून फलंदाजी केली. उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ६० धावा कुटल्या. तर लाबुशेनने ३१, स्टीव्ह स्मिथने २६ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. या डावात ऑस्ट्रेलियाने ८८ धावांची आघाडी घेतली होती.

Ind vs aus
IND vs AUS: अख्खी टीम ढेपाळली, पण पुजारा फेव्हिकॉलसारखा चिकटला; कोहलीचा तो सल्ला कामी आला - PHOTO

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज सुपरफ्लॉप..

पहिल्या डावात फ्लॉप ठरलेले भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात कमबॅक करतील,असे वाटत होते. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांना सुर गवसला नाही. एकट्या पुजाराला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला फलंदाजीत योगदान देता आले नाही.

श्रेयस अय्यरने २६ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल १५ धावांवर नाबाद राहिला. भारताचा दुसरा डाव ६० षटकअखेर १६३ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाने मिळवला ९ गडी राखून विजय

हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला केवळ ७६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने ४९ धावांची खेळी केली. तर लाबुशेनने २८ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com