Ind vs Aus  Saam Tv
क्रीडा

IND VS AUS : ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्रच ठरलं कोटलाच्या मैदानावर पराभवाचं कारण

या सामन्यात ऑस्ट्रलियाच्या फलंदाजांना काही सूर गवसला नाही. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचं जे प्रमुख अस्त्र आहे, तेच या सामन्यात त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं आहे.

Saam TV News

IND VS AUS:भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ६ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात ऑस्ट्रलियाच्या फलंदाजांना काही सूर गवसला नाही. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचं जे प्रमुख अस्त्र आहे, तेच या सामन्यात त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं आहे. (Latest Sports Updates)

प्रमुख अस्त्र ठरलं पराभवाचं कारण.

ऑस्ट्रलिया संघाने दुसऱ्या दिवशी आक्रमक कामगिरी करत भारतीय संघावर आघाडी घेतली होती. हीच कामगिरी करून ऑस्ट्रेलिया संघ मोठी धावसंख्या उभारणार असा अंदाज व्यक्त केला गेला होता.

मात्र तिसऱ्या दिवशी १९ षटकात ५२ धावांवर ऑस्टेलियाचे ९ फलंदाज माघारी परतले. यादरम्यान स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, ऍलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स हे फलंदाज पारंपरिक स्वीप शॉट खेळताना बाद झाले.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी स्वीप शॉट हा उत्तम पर्याय असू शकतो. मात्र भारतात आणि तेही कोटलाच्या खेळपट्टीवर स्वीप शॉट खेळून आक्रमण करणं ऑस्ट्रेलियाला चांगलच नडलं आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दास गुप्ता यांनी म्हटले की,'भारतात अगदी लहान मुलांना देखील हेच सांगितले जाते की, ज्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत नाही त्या खेळपट्टीवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करू नका. अशा खेळपट्टीवर अशा प्रकारचे शॉट खेळणं कठीण असतं . हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कोणीच कसं सांगितलं नाही.'

तसेच समालोचन करत असलेल्या दिनेश कार्तिकने देखील म्हटले की,' कदाचित ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी आधीच ठरवलं होतं की, परिस्थिती काहीही असो आपण आपल्याच हिशोबाने फलंदाजी करायची. जर तुम्ही आधीच ठरवलं असेल तर नक्कीच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

तसेच भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना वाटतं की, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हे आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार नाहीत. त्यांनी म्हटले की,'फिरकी गोलंदाजांचा सामना करणं ही कला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याची सवय नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT