

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी जोरदार कंबर कसली आहे. नाशिकच्या पहिल्याच जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. नाशिक दत्तक घेतो बोलल्यानंतर हा बाप फिरकलाच नाही,असं म्हणत नाशिकच्या विकासावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
चार वर्षांपूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या?
पहिल्यांदाच उत्तर हे आताच्या सरकारने दिले पाहिजे
त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळं सुरू आहे.
कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही
उमेदवाराने AB फॉर्म गिळला, कोणत्या थराला गेल्यात निवडणुका
या राज्यात बिनविरोध ६०- ७० जागा निवडून येतात
एकतर माणसं उभी राहू द्यायची नाही, पैसे धाक दाखवायचा
1952 साली जो पक्ष जन्माला आला, त्याला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागत आहे.
गिरीश महाजनांना झाडं तोडायची आहेत, लाकूडतोड्या बरा होता
झाडं छटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते छाटले
पक्षांमधली लोक छाटली बाहेरून झाड मागवली आणि ती आता पक्षात लावतायत.
महाराष्ट्रामध्ये हे कोणत्या राजकारण आणि निवडणुका सुरू आहेत
2012 साली ज्यावेळेस माझी सत्ता आली 2017 साली फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक दत्तक घेतो
- त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि त्यांना सत्ता दिली
- दत्तक घेण्याची घोषणा करून परत हा बाप फिरलाच नाही
- 2012 साली आम्ही सत्तेत आलो त्यावेळी देखील अत्यंत उत्तम कुंभमेळा झाला
त्यावेळी एकही झाड कापल गेल नाही आत्ता का कापले जातंय?
उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला म्हणून अगदी अमेरिकेत देखील सत्कार झाले
कुंभमेळा झाल्यानंतर ज्यावेळेस साधू संत घरी जातील त्यावेळेस त्यांना ही जमीनच्या घशात घालायची आहेत
हे यांच आधीच ठरतं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.