Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Shruti Vilas Kadam

प्रतिकारशक्ती वाढते

हळदीतील कर्क्युमिन आणि दुधातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

Turmeric milk | yandex

सर्दी, खोकला आणि घशाचा त्रास कमी होतो

हळदीचं दूध घशाला आराम देतं आणि कफ कमी करण्यास मदत करतं, त्यामुळे थंडीतील सामान्य आजारांपासून दिलासा मिळतो.

शरीराला उष्णता मिळते

थंड वातावरणात हळदीचं गरम दूध प्यायल्याने शरीर आतून उबदार राहतं आणि थंडी कमी जाणवते.

Turmeric Milk

हाडे आणि सांधे मजबूत होतात

दुधातील कॅल्शियम आणि हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी व सूज कमी करण्यास मदत करतात.

Turmeric Milk | Saam Tv

जखमा लवकर भरून येण्यास मदत

हळदीतील औषधी गुणधर्म शरीरातील जखमा आणि सूज लवकर बरी होण्यास उपयोगी ठरतात.

Turmeric Milk

झोपेची गुणवत्ता सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घेतल्यास मन शांत राहतं आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.

Turmeric Milk

पचनक्रिया सुधारते

हळद पचन सुधारण्यास मदत करते, त्यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखीच्या तक्रारी कमी होतात.

Milk Turmeric | Yandex

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

Malpua Recipe | Google
येथे क्लिक करा