ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळताना ॲडलेडमध्ये भारतीय संघाला झुंज द्यावी लागेल अशी भीती अनेकांनी वर्तवली होती. ही भीती अखेर खरी ठरलीय. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या पुनरागमनानंतर संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल असे वाटत असतानाच संघाची फलंदाजी पुर्णपणे अपयशी ठरलीय. कांगारूंचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याने भारतीय फलंदाजी उद्धवस्त झाली.
स्टार्कच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाला तग धरता आला नाही आणि अवघ्या १८० धावांत सर्वांना गुडघे टेकावे लागले.भारतीय संघातील युवा ऑलराउंडर नितीश रेड्डीने डाव सावरला. त्याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. रेड्डीच्या धावांच्या मदतीने भारतीय संघाची धावसंख्या १५० वर पोहोचली. दरम्यान ॲडलेडमध्ये टीम इंडियाची फलंदाजी का अपयशी ठरली हे पाहू.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघासाठी बाधक ठरला. सामना सुरू होण्यापूर्वी ढगाळ वातावरण होते. अशा परिस्थितीत रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली असती तर त्याचा निश्चितच संघाला फायदा झाला असता. यावेळी टीम इंडियाची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था टीम ऑस्ट्रेलियाची झाली असण्याची शक्यता आहे.
ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक बॉल चॅलेंजमध्ये टॉप ऑर्डरमधील एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावा करता आली नाही. कसोटीच्या पहिल्या दिवशीच संघाची टॉप ऑर्डर फेल ठरली. इतकेच काय मागील सामन्यात धावांचा पाऊस पाडणारा यशस्वी जायस्वालही अपयशी ठरलाय. त्याला साधं खातंही उघडता आले नाही. भारताकडून फलंदाजी करताना केएल राहुलने ६७ चेंडूंमध्ये ३७ धावा आणि शुभमन गिल यांनी ५१ चेंडूत ३१ धावा केल्या. तर विराट कोहली फक्त ७ धावा करू शकला.
या सामन्यासाठी भारताने आपल्या फलंदाजीचा क्रम बदलला होता. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातही संघाने यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीला मैदानात उतरवले, पण यावेळी संघाची खेळी उलटी पडली. यशस्वीला खातेही उघडता आले नाही, तर राहुलला केवळ ३७ धावा करता आल्या. तसेच संघाने कर्णधार रोहितला सहाव्या क्रमांकावर पाठवलं. याचा उलटा परिणाम झाला. रोहितला केवळ तीन धावा करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.