IND vs AUS: Saam tv
Sports

IND vs AUS 2nd T20I : लक्ष्य मोठं डोंगराएवढं! इशान-'ऋतु'राज यशस्वी बरसला, रिंकूचा कडकडाट; ऑस्ट्रेलियाला २३६ धावांचं टार्गेट

IND vs AUS 2nd T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरु आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी २० षटकात धावांचा वर्षाव केला.

Vishal Gangurde

IND vs AUS 2nd T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरु आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी २० षटकात धावांचा वर्षाव केला. सामन्यात टीम इंडियाच्या ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ऑस्ट्रेलियाला 236 धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल, ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतक ठोकले. तर ऋतुराजने टीम इंडियासाठी सर्वाधिक ५८ धावा चोपल्या. टीम इंडियाने २० षटकात ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी एलिसने २ गडी बाद केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यशस्वी जयस्वालने टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करून दिली. टीम इंडियाला पहिला धक्का ७७ धावांवर बसला. यशस्वी जयस्वालने २५ चेंडूत ५३ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनने ८७ धावांची भागीदारी रचली.

ईशान किशनने ३२ चेंडूत ५२ धावा चोपल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव १० चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड ४३ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. रिंकू सिंहनेही तुफानी खेळी खेळली. रिंकूनेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढली. रिंकूने ९ चेंडूत ३१ धावा कुटल्या. तर तिलक वर्मा २ चेंडूत ७ धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT