वर्ल्डकप झाल्यानंतर आता देशात आयपीएलची चर्चा सुरू झालीय. ही लीग जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली लीग आहे.आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचं नशीब पलटलं आहे. बहुतेक खेळाडूंना या लीगने प्रसिद्धी आणि अमाप पैसा दिलाय. २०२४ च्या आयपीएलसाठी १९ डिसेंबरला लिलाव दुबईत केला जाणार आहे. (Latest News)
आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच दुबईत होणार आहे. पण याआधीही सर्व संघांनी आपल्या टीममध्ये कायम ठेवलेल्या आणि संघातून बाहेर केलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केलीय. सर्व १० संघांनी कोण-कोणते खेळाडू संघातून वगळले ते जाणून घेऊ.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
CSK: चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या खेळाडूंना ठेवलं संघात
एमएस धोनी (यष्टीरक्षक/ कर्णधार), रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड़, दीपक चाहर, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजय मंडल, निशांत सिंधु, शेख रशीद, मुकेश चौधरी, मोईन अली, डेवोन कॉनवे, मिशेल सेंटनर, महेश तीक्ष्णा, मतीशा पथिराना.
या खेळाडूंना केलं बाहेर
बेन स्टोक्स, अंबाती रायडू, ड्वेन प्रीटोरियस, काइल जॅमीसन, भगत वर्मा, सिसंडा मगला, शुभ्रांशु सेनापती, आकाश सिंह.
MI: हे आहेत मुंबई इंडियन्सचे शिलेदार
रोहित शर्मा (कर्णधार), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शम्स मुल्लानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ रोमारियो शेफर्ड.
हे खेळाडू नसतील MIसोबत
अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन जॉन्सन.
RCB: हे खेळाडू दिसतील आरसीबीमध्ये
फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (व्यापार), विशाल विजयकुमार, आकाश रे मोहम्मद, सिराज दीप, सी. टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार.
RCB च्या संघातून कोणाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता
वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.
Gujarat Titans : गुजरात टायटन्स दिसतील हे खेळाडू
डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, आर. राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा.
गुजरात टायटन्समधून कोण गेलं बाहेर
यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.
Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात हे खेळाडू कायम
केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, के गौतम, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेराक मंकड, युधवीर सिंग, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, ए. मिश्रा, नवीन-उल-हक.
लखनऊ सुपर जायंट्सने या खेळाडूंना केलं बाहेर
डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकट, मनन वोहरा, करण शर्मा, सूर्यांश शेडगे, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया.
KKR: हे खेळाडू असतील KKR चे सरदार
नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, आंद्रे रसेल, नीतीश राणा, वेंकेटश अय्यर, डेविड विज, अनुकूल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.
कोणाला केलं बाहेर
शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीस, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, जॉन्सन चार्ल्स आणि टीम साऊदी.
Hyderabad Sunrisers : हैदराबाद सनरायझर्समध्ये कोणते खेळाडू असतील
एडन मार्कराम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को येनेसन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद.
हे खेळाडू नसतील संघात
हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील हुसेन, आदिल रशीद.
Punjab Kings : पंजाब किंग्सच्या संघाने या खेळाडूंना ठेवलं कायम
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस , विद्वत कावरप्पा.
या खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता
भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा आणि शाहरुख खान.
Rajsthan Royals: राजस्थानच्या संघात कोणते खेळाडू दिसतील
संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, कृणाल सिंग राठौर, डोनाव्हॉन फरेरा, ध्रुव जुरेल, जोस बटलर, रायन पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसीद कृष्णा, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, आवेश खान.
हे खेळाडू नसतील
राजस्थान रॉयल्स संघात जो रूट, अब्दुल बासिथ, जेसन होल्डर, आकाश वशिष्ठ, कुलदीप यादव, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ.
Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सची कमान संभाळतील हे खेळाडू
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, लुंगी एनगिडी, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे.
या खेळाडूंना काढलं बाहेर
रोवमन पॉवेल, रिले रोसो, चेतन साकारिया, मनीष पांडे, फिल सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.
या खेळाडूंची यापूर्वी झालाय ट्रेड
आयपीएलच्या वेबसाइटने केवळ तीन ट्रेडची पुष्टी केलीय. रोमॅरियो शेफर्डला मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सकडून ट्रेड केलं होतं. राजस्थान रॉयल्सने देवदत्त पडिक्कलच्या बदल्यात आवेश खान लखनऊ सुपर जायंट्सशी ट्रेड केला होता. शाहबाज अहमद आणि मयंक डागर हे खेळाडू आहेत ज्यांना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादने ट्रेड केलं आहे.
हे खेळाडू खेळणार नाहीत आयपीएल
आयपीएल २०२४च्या लिलावापूर्वीच, बेन स्टोक्स आणि जो रूट सारख्या खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. या खेळाडूंनी या हंगामात आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन प्रिटोरियसला बाहेर केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.