csk vs gt opening match
csk vs gt opening matchTwitter

IPL 2023: आयपीएलचा ओपनिंग सामना म्हणजे 'बॅड लक', एमएस धोनी अन् पंड्याला राहावं लागेल सावध; पाहा आकडेवारी

CSK VS GT: गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसून येणार आहे. तर चेन्नई संघाची जबाबदारी एमएस धोनीकडे असणार आहे .
Published on

IPL 2023 CSK VS GT: आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ३१ मार्चपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतवर्षीचा चॅम्पियन गुजरात टायटन्स संघ आणि ४ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये पार पडणार आहे.

गुजरात संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करताना दिसून येणार आहे. तर चेन्नई संघाची जबाबदारी एमएस धोनीकडे असणार आहे .

या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना सावध करणारी आकडेवारी समोर येत आहे.

csk vs gt opening match
Issy Wong Hat Trick Video: WPL ची पहिली हॅटट्रिक घेत इस्सीने रचला इतिहास,पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

आयपीएल स्पर्धेला २००८ पासून प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत एकूण १५ हंगाम खेळले गेले आहेत. या स्पर्धेतील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर केवळ ओपनिंग सामना खेळणाऱ्या संघाने केवळ ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरले आहे. (Latest sports updates)

यामध्ये ज्या संघाने ओपनिंगचा सामना जिंकला त्याच संघाने ३ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाने २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे.

त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

csk vs gt opening match
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

आयपीएलचा ओपनिंग सामना खेळून जेतेपद मिळवणाऱ्या संघांची आकडेवारी...

पहिला सामना खेळून जेतेपद मिळवणारे संघ:

चेन्नई सुपर किंग्ज -२०११

कोलकता नाईट रायडर्स -२०१४

मुंबई इंडियन्स -२०१५

चेन्नई सुपर किंग्ज -२०१८

मुंबई इंडियन्स -२०२०

पहिला सामना जिंकून जेतेपद मिळवणारे संघ:

चेन्नई सुपर किंग्ज -२०११

कोलकता नाईट रायडर्स -२०१४

चेन्नई सुपर किंग्ज -२०१८

पहिला सामना गमावून जेतेपद पटकावणारे संघ:

मुंबई इंडियन्स -२०१५

मुंबई इंडियन्स -२०२०

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com